मुंबईसह अनेक शहरांत ईडीचे छापे   

कोलकाता/मुंबई : एका कंपनीतील गैरव्यवहाराशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई, बंगळुरु, जालंधर, इंदूर आणि कोलकातासह विविध शहरांत बुधवारी छापे घातले. ईडीच्या विविध पथकांनी काल एकाच वेळी ही कारवाई केली. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार शोधमोहीम राबविण्यात आली, असे ईडीने समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या कारवाईत ईडीने ६.४३ लाखांचे परदेशी चलन जप्त केले.

Related Articles